---Advertisement---
जळगाव जिल्हा

6 बंद्यांना देण्यात आली 60 दिवसांची विशेष माफी, ‘हे’ आहे त्यामागील कारण??

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकारात 3 ऑक्टोबर, 2019 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत 89 शिक्षा बंद्यांना 90 दिवसांची विशेष माफी मंजूर करण्यात आली आहे. तर विभागीय कारागृह उपमहानिरीक्षक यांचे अधिकारातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी देण्यात आली आहे. असे जनसंपर्क अधिकारी, कारागृह मुख्यालय, पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

jail jpg webp

राज्यातील कारागृहातील बंद्यांचा शैक्षणिकस्तर उंचावणे तसेच बंद्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व यांची जाणीव विकसित व्हावी. याकरिता बंद्यांना शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे. तसेच जास्तीत जास्त बंद्यांनी या शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा, याकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांचे संयुक्त उपक्रमानुसार कारागृहात अभ्यासकेंद्र व परीक्षाकेंद्र सन 2014 पासून सुरु करण्यात आले आहे.

---Advertisement---

कारागृहातील परीक्षा केंद्रातून दहावी/बारावी समकक्ष/पदविका/पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बंद्यांनी 10 वी, 12 वी समकक्ष/बी. ए./बी. कॉम/ एम. ए. इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेतलेल्या आहेत.

या उपक्रमाद्वारे बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन होऊन कारागृहातून मुक्त झाल्यावर सुशिक्षित नागरिक म्हणून समाजात चांगले जीवन जगण्यास प्रवृत्त होईल. स्वत: आर्थिक उत्पन्न मिळवून स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभा राहील व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घेऊ शकेल. शिक्षणाचे महत्व व शिक्षणाचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम या संकल्पनेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करू शकेल अशी कारागृह प्रशासनाची धारणा आहे. असे जनसंपर्क अधिकारी कार्यालय, कारागृह मुख्यालय, पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---