VIDEO ! जळगावमध्ये आकाशात दिसली उडती तबकडी ; हे नेमकं आहे तरी काय? समोर आली मजेशीर माहिती
जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । गुरुवारी सायंकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या आकाशात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आकाशातून पाच गोळे एकाच रांगेतून जाताना नागरिकांनी बघितले. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी देखील हे दृश्य पाहायला मिळाले आहे. या अज्ञात वस्तूने जळगावकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आकाशातून जाणाऱ्या ही अज्ञात वस्तू नेमकी आहे तरी काय? अखेर त्याचा उलगडा खगोल अभ्यासकांनी केला. या अज्ञात वस्तूचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो महाराष्ट्र टाईम या वेबपोर्टलने प्रकाशित केला आहे
गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास अवकाशातून जणू रेल्वे धावत असल्याचे दुर्मिळ चित्र आकाशात पाहायला मिळाले.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही अज्ञात वस्तू दिसून आली. जळगाव जिल्ह्यामधील बऱ्याच ठिकाणी ही अज्ञात वस्तू दिसल्याने जळगावकरांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी आकाशात हे सॅटलाईट पाहिल्यामुळे नागरिक गोंधळल्याचंही पाहायला मिळालं.
दरम्यान, ही तबकडी वर्तुळाकार, अंडाकृती आकाराची नव्हती. तर, आयाताकृती असल्याने चर्चा सुरू झाली. मात्र, ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलोन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे. भक्कम इंटरनेट जोडणी साठी अवकाशात अशा प्रकारच्या 55 सॅटेलाईट ची एक ट्रेन सोडण्यात आली असून तीच आकाशात दिसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले. दरम्यान, हे सॅटॅलाइट शुक्रवारी देखील रात्री आठ वाजता सुमारास दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
स्कायलिंक आहे तरी काय?
स्कायलिंक हे स्पेस एक्स द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहांचा समूह आहे. जो 47 देशांना उपग्रह इंटरनेट कव्हरेज प्रदान करतो. त्याचे यावर्षी नंतर जागतिक मोबाईल सेवेचे उद्दिष्ट आहे. स्पेस एक्स ही एलन मस्क यांची खाजगी इंटरनेट कंपनी आहे. संस्थेने 2019 मध्ये स्कायलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2022 पर्यंत स्कायलिंकमध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3300 पेक्षा जास्त वस्तुमान निर्मित लहान उपग्रहांचा समावेश आहे. स्कायलिंक उपग्रह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दिसल्याने नागरिकांत विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते.