⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

दादरसह ज्वारी व बाजरीच्या दरात घसरण ; घ्या जाणून प्रति किलोचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दादर या शेतमालाचे पेरा वाढून उत्पादन जादा आल्याने दादरसह ज्वारी व बाजरीच्या दरात प्रती किलोमागे ६ ते १० रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या वर्षी दादरचे उत्पादन कमी आल्याने दादरचे किलोचे भाव ५५ ते ६० रुपयांवर गेले होते. यंदा शेतकऱ्यांनी दादरचा पेरा वाढविला. त्यामुळे उत्पादनात वाढ होवून अधिक दादर बाजारात आल्याने यंदा दादरचे दर ३५ ते ४२ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत.

भाकरीसाठी मधुमेही रुग्ण ज्वारी पेक्षा दादरला प्राधान्य देतात. यंदा उत्पादन अधिक असल्याने ज्वारीचे ग्राहक दादरकडे वर्ग होऊन मागणीत घट झाली आहे. त्याचा परिणाम ज्वारीचे गेल्या महिन्यात असलेले ३५ रुपये किलोच्या दरातही घट होवून ते २९ ३१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर असणारी बाजरी २९ ते ३० रुपये किलो आहे