⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

जळगाव शहरातील गाळे धारकांचा प्रश्न मोकळा ; आ.भोळेंच्या प्रयत्नांना यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल 2023 । जळगाव शहरातील २३६८ गाडेधारकांचा अनेक दिवसांपासुन शासन स्तरावर प्रलंबित होता. गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. दि.२५/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतांना यांनी जळगाव शहर मनपा मालकीच्या प्रलंबित गाळ्यांच्या संदर्भात लक्षवेधी मांडली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परंतु राज्यात जनतेच्या मनातील सरकार आल्यावर आज अखेर आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या प्रयत्नांना यश आले.

जळगाव शहरातील २३६८ गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासंदर्भात आगामी २ दिवसांमध्ये अधिसूचना काढण्यात येणार असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार राजुमामा भोळे यांनी कळविले आहे.


याबद्दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आमदार राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहे.