⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | अभिमानास्पद! जळगावची सॉफ्टबॉलपटू सई करणार चीनमध्ये होणाऱ्या आशियाडसाठी भारताचे नेतृत्व!

अभिमानास्पद! जळगावची सॉफ्टबॉलपटू सई करणार चीनमध्ये होणाऱ्या आशियाडसाठी भारताचे नेतृत्व!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| २५ जुलै २०२३| जळगाव येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू सई अनिल जोशी हिची आशियाडसाठी भारताच्या १६ सदस्य महिला सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे. सई सोबतच महाराष्ट्राच्या पाच महिला खेळाडूंनी भारतीय संघ स्थान मिळवले आहे. भारतीय सॉफ्टबॉल संघटनेतर्फे या संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली.

आशियाड सामने चीनमधील हांगझु शहरात यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार आहेत. त्यात सॉफ्टबॉलचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. सई आशियाडसारख्या अव्वल स्पर्धेत खेळणारी खानदेशातील पहिलीच खेळाडू ठरणार आहे.

याआधी सईने बऱ्याच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या असून यंदाच्या फेडरेशन कप विजेत्या संघातही ती होती. सई विधी महाविद्यालयाची विद्यार्थी असून जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांची कन्या आहे. आशियाडसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षण ५ ते २५ ऑगस्ट दरम्यान चंदिगड येथे होणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह