जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२५ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचे नेत गिरीश महाजन यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नात असून त्यांचे सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. यातच जामनेर येथील तरुणाच्या हत्येच्या प्रकरणावरून एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया देत खरे या प्रकरणातील खरे आरोपी पकडले जावेत, असं ते म्हणाले होते. दरम्यान यावर गिरीश महाजन यांनी जे विधान केलं त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?

जामनेर येथे तरुणाच्या हत्या प्रकरणात खडसे यांच्या मनात काय माहिती नाही,त्यांना कोणता संशय असेल तर ते सांगतील त्यांना अटक केली जाईल. माझंही नाव ते घेत असतील मीही पोलिसाना सरेंडर करून स्वतःला अटक करून घेणार, असं वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना खोचक टोला लावला आहे.
जळगावमध्ये ते बोलत होते. जामनेर येथे झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांनी आता पर्यंत नऊ लोकांना अटक केली असून पोलिस तपास सुरू आहे, असंही ते म्हणाले. मात्र महजानांच्या या विधानामुळे आता त्यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून या टोल्याला खडसे काय प्रत्युत्तर देतात याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.








