⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

स्मृती इराणींनी रांगेत उभे राहून उघडले पोस्टाचे ‘हे’ खाते ; पहा किती व्याज मिळणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही देशातील बरेच जण पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) नावाची योजना सुरु केली आहे. या या योजनेची जादू महिलांमध्ये वाढत आहे. या योजनेची जादू महिलांमध्ये वाढत आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २६ एप्रिल रोजी संसद मार्गावरील पोस्ट ऑफिस गाठले आणि रांगेत उभे राहून हे खाते उघडले. महिलांना बचत करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना अधिक व्याज मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू केली होती. ही योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. खाते उघडल्यानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट केले.

चक्रवाढ व्याजासह कोणता लाभ मिळेल?
तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मिळवू शकता. या योजनेअंतर्गत महिलांना 7.5 टक्के त्रैमासिक व्याज दिले जाते. याचा अर्थ त्यात पैसे गुंतवल्यावर तुम्हाला परताव्याच्या स्वरूपात चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 2 वर्षांचा आहे आणि तुम्ही त्यात फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एकदा पैसे गुंतवले की 2 वर्षांनीच काढता येतात असे नाही. योजनेंतर्गत, दरम्यान पैसे काढण्याचा पर्याय देखील दिला जातो.

ही योजना २ वर्षांसाठी आहे
ही योजना केवळ 2 वर्षांसाठी सुरू होत असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच सांगितले होते. म्हणजेच, जर तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंतच करू शकता. या अंतर्गत कोणत्याही वयोगटातील मुली किंवा महिला खाते उघडू शकतात. होय, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या योजनेत फक्त तुम्ही 2 लाख रुपये गुंतवू शकता. योजनेत फक्त एकरकमी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजेच FD प्रमाणेच तुम्ही संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवू शकता.

कर सवलत उपलब्ध नाही
योजनेंतर्गत व्याज चांगले आहे, परंतु तुम्हाला त्यात गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ दिला जात नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जात नाही. देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचे खाते कोठूनही उघडता येते. खाते उघडण्यासाठी आधार, पॅन आणि रंगीत छायाचित्र आवश्यक असेल.