---Advertisement---
वाणिज्य

रेल्वेचा मोठा निर्णय! आता थर्ड AC कोचमध्ये झोपण्याचा नियम बदलला..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । भारतीय रेल्वेतून (Indian Railway) दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी प्रवास करतात. रेल्वेकडून अनेक नियम बदलले जातात. जे अनेकदा रेल्वेने प्रवास करतात त्यांना बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे आवश्यक असते. दरम्यान, रेल्वेने आता थर्ड एसी-स्लीपर कोचमध्ये झोपण्याचा नियम बदलला आहे. यापूर्वी रेल्वे बोर्डाच्या वतीने प्रवाशांना जास्तीत जास्त नऊ तास झोपण्याची परवानगी होती. मात्र आता ही वेळ 8 तासांवर आणण्यात आली आहे. Sleeping Rule Changed Railway Third AC Coach

third ac jpg webp webp

ही वेळ पूर्वीपेक्षा बदलली आहे
नियमानुसार, पूर्वीचे प्रवासी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत एसी कोच आणि स्लीपरमध्ये झोपू शकत होते. पण रेल्वेच्या बदललेल्या नियमांनुसार आता तुम्हाला रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपता येणार आहे. यापेक्षा जास्त झोपल्यास तुम्हाला रेल्वे नियमावलीनुसार दंडही भरावा लागू शकतो. हा बदल फक्त ज्या गाड्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था आहे त्यांनाच लागू आहे. हा बदल अंमलात आणण्यामागचे कारण म्हणजे प्रवाशांना योग्य सोयीसुविधा देणे.

---Advertisement---

वेळ 9 तासांवरून 8 तासांवर आणला
वास्तविक रात्री १० ते सकाळी ६ ही वेळ झोपण्यासाठी चांगली मानली जाते. याआधी काही प्रवाशांनी रात्री नऊ ते सहा या वेळेत जेवण केल्याने इतर प्रवासी नाराज व्हायचे. आता रात्री १० वाजेपर्यंत प्रवाशी रात्रीचे जेवण वगैरेपासून मुक्त होतील आणि त्यांच्या बर्थवर झोपून आरामात प्रवास करू शकतील, असा रेल्वेचा विश्वास आहे. वेळा बदलण्याचे आणखी एक कारण म्हणजे लोअर बर्थवरील प्रवासी बऱ्याच दिवसांपासून तक्रार करत आहेत की मधल्या बर्थचे प्रवासी लवकर झोपतात. त्यामुळे खाली सीटवर बसलेल्या प्रवाशाला त्रास होतो.

अशा तक्रारी आणि सूचनांचा विचार करून रेल्वेने झोपण्याच्या वेळेत बदल केला आहे. नवीन नियमानुसार मिडल बर्थचा प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत झोपू शकतो. यानंतर त्याला बर्थ रिकामा करावा लागेल. या वेळेपूर्वी किंवा नंतर कोणी प्रवासी झोपलेला दिसला तर त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करू शकता. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध कारवाई होऊ शकते. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा नियम 2017 मध्ये रेल्वेने लागू केला होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---