पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

मार्च 16, 2026 4:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली. येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले. जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

paldhislub 1

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधीतील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत असून गेल्या काही महिन्यांपासून येथे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, कामगार नियमितप्रमाणे काम करत असताना अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब (साचा) कोसळला आणि क्षणातच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, स्लॅब कोसळण्यामागचे नेमके कारण काय, बांधकाम प्रक्रियेत निष्काळजीपणा झाला का, याचा सखोल तपास करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यात सहभाग घेतला. त्यांनी जखमी कामगारांची विचारपूस करत त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now