जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२५ । सध्या उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातच रेल्वे प्रशासनाने बेलगाम ते मऊ, वास्को दी गामा ते मुजफ्फरपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान अतिरिक्त ६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्या जळगाव आणि भुसावळमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

बेलगाम ते मऊ साप्ताहिक विशेष (१२ सेवा)
गाडी क्रमांक ०७३२७ ६ एप्रिल ते ११ मे पर्यंत दर रविवारी बेलगाम येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि मऊ येथे मंगळवार रोजी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३२८ ही ९ एप्रिल ते १४ मे पर्यंत दर बुधवारी मऊ येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि बेलगाम येथे शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल.
या गाड्यांना लोंढा, धारवार, हुबळी, बादामी, बागलकोट, आलमट्टी, विजयपुरा, सोलापूर, कुडुवाडी, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्जापूर, वाराणसी, जंघई, शाहगंज, आजमगढ असे थांबे आहेत.
वास्को दी गामा ते मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष (१८ सेवा)
गाडी क्रमांक ०७३११ ही ७ एप्रिल ते २ जूनपर्यंत दर सोमवारी वास्को दी गामा येथून दुपारी ४ वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर येथे बुधवार रोजी रात्री १२:३० वाजता पोहोचेल.गाडी क्रमांक ०७३१२ ही १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी २:४५ वाजता सुटेल आणि वास्को दी गामा येथे शनिवार रोजी दुपारी २:५५ वाजता पोहोचेल.
या गाड्यांना मडगाव, थिवीम, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर असे थांबे दिले आहेत.
नागपूर ते पुणे साप्ताहिक वातानुकूलित विशेष (१४ सेवा)
गाडी क्रमांक ०१४४० ही १३ एप्रिल ते २५ मेपर्यंत दर रविवारी नागपूर येथून दुपारी ४:१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सोमवारी सकाळी ७:२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४३९ ही १२ एप्रिल ते २४ मेपर्यंत दर शनिवारी पुणे येथून सायंकाळी ७:५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे रविवारी दुपारी २:४५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा असे थांबे दिले आहेत.
बेलगाम नाही भाऊ बेळगांव आहे ते. थोडी भाषा सुधारा.