---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! भुसावळ विभागातून धावणाऱ्या सहा रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२४ । भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. अयोध्या धाम येथे दुहेरी रेल्वे मार्गासाठी अयोध्या कॅन्ट ते सलारपूर दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी सहा प्रवासी गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या गाड्या सलारपूरपर्यंत जाऊन माघारी फिरतील. या सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या आहेत.

train 3 jpg webp

यात क्र. २२१२९ एलटीटी- अयोध्या कॅन्ट तुलसी एक्स्प्रेस ७ व९ जानेवारीला सुलतानपूर येथे शॉर्ट टर्मिनेट केली आहे. क्र. २२१३० अयोध्या कॅन्ट एलटीटी तुलसी एक्स्प्रेस ८ आणि १० जानेवारी रोजी

---Advertisement---

सुलतानपूरहून सुटेल. क्र. २२१८३ एलटीटी- अयोध्या केंन्ट साकेत एक्स्प्रेस १० जानेवारीला सुलतानपूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. क्र. २२१८४ अयोध्या कॅन्ट -एलटीटी तुलसी एक्स्प्रेस ११ जानेवारीला सुलतानपूर येथून सुटेल तर क्र. २२१०३ एलटीटी -अयोध्या कॅन्ट एक्स्प्रेस ८ जानेवारीला सुलतानपूरला शॉर्ट टर्मिनेट असेल. क्र. २२१०४ अयोध्या कॅन्ट- एलटीटी एक्स्प्रेस ९ जानेवारीला सुलतानपूरहून सुटणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---