⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 9, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ-सुरतसह सहा रेल्वे गाड्या ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

भुसावळ-सुरतसह सहा रेल्वे गाड्या ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२४ । भुसावळहुन सुरतकडे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पुनर्विकासाच्या कामासाठी सहा रेल्वे गाड्या सुरत ऐवजी उधना स्थानकातून सुटतील. तर सहा गाड्या या उधना स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना उधनापासून सुरतला जाण्यासाठी ३० रुपये रिक्षाभाडयाचा भुर्दैड लागेल. कारण, भुसावळ-उधना भाडे १२० रुपये आहे. पुढे सुरतपर्यंत रिक्षाने जावे लागेल.

नवीन बदलानुसार १९००७ सुरत-भुसावळ एक्सप्रेस १० जून ते ७ सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकातून ५.२४ वाजता सुटेल. १९००५ सुरत -भुसावळ एक्स्प्रेस १० जून ते ७ सप्टेंबरदरम्यान ११.३० वाजता सुटेल. ०१०६५ सुरत छपरा विशेष गाडी १७ जून ते २ सप्टेंबरदरम्यान सकाळी ८.३५ वाजता सुटेल, १९०४५ सुरत- छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस १२ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान सकाळी १०.२० वाजता, २२९४७ सुरत भागलपुर सुपरफास्ट एक्सप्रेस १९ जून ते ७ सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकातून १०.२० वाजता, २०९२५ सुरत अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस ११ जून ते ६ सप्टेंबरपर्यंत दुपारी १२.३० वाजता सुटेल.

६ गाड्या शॉर्ट टर्मिनेट
१९००६ भुसावळ – सुरत एक्स्प्रेस, १९००८ भुसावळ-सुरत एक्स्प्रेस ९ जून ते ७ सप्टेंबर, २०९२६ अमरावती – सुरत सुपरफास्ट एक्सप्रेस १० जून ते ७ सप्टेंबर, ०९०६६ छपरा – सुरत विशेष गाडी १२ जून ते ४ सप्टेंबर, १९०४६ छपरा – सुरत ताप्तीगंगा एक्सप्रेस ९ जून ते६ सप्टेंबर, २२९४८ भागलपूर – सुस्त सुपरफास्ट १० जून ते ५ सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकापर्यंतच धावेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.