जळगावकरांसाठी खुशखबर! पुणे ते जळगाव दरम्यान सहा नवीन विशेष रेल्वे धावणार

सप्टेंबर 18, 2025 7:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२५ । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ उत्सवाच्या हंगामात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यात पुणे ते जळगाव दरम्यान सहा नवीन विशेष रेल्वे धावणार आहे. या रेल्वेंना जळगाव, भुसावळ थांबा आहे.

train

गाडी क्रमांक ०१४३१ पुणे-गाजीपुर सिटी ही रेल्वे २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी पुणे येथून सकाळी ६.४० वाजता सुटेल, तर जळगावला दुपारी ३.२३ वाजता पोहोचेल. ०१४३२ गाजीपुर सिटी-पुणे विशेष गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी व बुधवारी गाजीपुर सिटीवरून रात्री १०.४० वाजता सुटेल आणि भुसावळला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता, जळगावला ६.५० वाजता तर दुपारी ४.२० वाजता पुणे येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४८१ पुणे-दाणापूर विशेष रेल्वे गाडी २६ सप्टेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी पुणे येथून रात्री ७.५५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२८ वाजता जळगावला पोहोचेल. ०१४८२ दाणापूर-पुणे विशेष गाडी २८ सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी व रविवारी दानापूर येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता जळगावात व रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ०१२०१ नागपूर हडपसर २९ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी व गुरुवारी नागपूर येथून रात्री ७.४० वाजता सुटेल व पहाटे २.४५ वाजता जळगावात थांबा घेईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now