जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात असून याच दरम्यान एका ट्रकमधून 8,476 किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या रक्कमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला आहे. ही चांदी जप्त करण्यात आली आहे.
मानखुर्द पोलीस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत आहे. या तपासणी दरम्यान शुक्रवारी रात्री एका वाहनाची तपासणी करण्यात आली. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी मिळाली. मोठ्या प्रमाणावर चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. या चांदीचे वजन करण्यात आले. 8,476 किलोग्राम ही चांदी भरली. त्या चांदीची बाजारातील किंमत 80 कोटी रुपये आहे.
अधिकाऱ्यांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत तिचा वापर होणार होता का? त्याची चौकशी निवडणूक आयोगाचे पथक करत आहे.
जळगाव जिल्ह्यातही 4 कोटीं 20 लाखांची रोकड जप्त
जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेचे अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तर आजपावतो 4 कोटीं 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त अवैध दारू,मादक द्रव्य या बरोबरच इतर मुद्देमाल करण्यात आला आहे. जिल्ह्यात खाजगी बसेस, एसटी बसेस याबरोबरच इतर चार चाकी तसेच उमेदवारांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे.