⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | सरकारी योजना | या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरिता मिळेल इतके अनुदान; कसा घ्याल लाभ

या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरिता मिळेल इतके अनुदान; कसा घ्याल लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना

Shubhmangal Samuhik Vivah Yojana | जळगाव लाईव्ह न्यूज । सामूहिक / नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- (रुपये – दहा हजार मात्र) एवढे अनुदान देण्यात येते व सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे रुपये – 2000/- ( रुपये दोन हजार मात्र) एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते. (Government Schemes for Marriage)

खालील अटींची पुर्तता करणाऱ्यास सदर योजनेचा लाभ मिळू शकेल
1) वधू जळगाव जिल्हयाची स्थानिक रहिवाशी असावी, शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेत मजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला, उत्पन्नाची मर्यादा – वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखपेक्षा जास्त असू नये त्यासाठी उत्पनाचा दाखला, या कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ खुला व इतर मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी देण्यात येतो. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाही कारण त्यांच्या साठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वंतत्र योजना राबविण्यात येत आहे.

2) नोंदणीकृत विवाह ( Registered Marriage ) प्रमाणपत्र
3) सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत विवाह करणारे जोडपे, बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयाचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात रुपये 20/- च्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. नोंदणीकृत एका स्वंयसेवी संस्थेस एका सोहळयात किमान 5 व कमाल 100 जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहील.

अधिक माहितीसाठी – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दुरवध्वनी क्रमांक – 0257-2228828वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

author avatar
Tushar Bhambare