पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी श्रीकांत मोरे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी श्रीकांत मोरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक दीपक कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमर बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटने अंतर्गत पोलीस मित्र संघटना कार्यरत आहे. श्रीकांत मोरे म्हणाले की, लवकरच संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ात, प्रत्येक तालुक्यात व गाव तिथे शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच आमच्या प्रयत्नांना यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. श्री. मोरे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय सरचिटणीस वजीर शेख, राष्ट्रीय संपर्कप्रमुख धनश्री उत्पात, राष्ट्रीय निरीक्षक उमेश काशीकर, राष्ट्रीय समन्वयक रमेश जोशी, राष्ट्रीय महामंत्री निजामभाई पटेल, राष्ट्रीय सहसचिव महाराष्ट्र श्र्वेता व्हनमाने, प्रदेश उपाध्यक्षा जागृती महाजन, महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत नजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संतोष जावळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे आदींनी अभिनंदन केले आहे.