जळगाव शहर

गाळेधारकांचे तिरडी आंदोलन करून अनोख्यारितीने मनपाचा निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । शहरातील १६ मार्केटच्यागाळेधारकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत असून दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज गाळेधारकांनी तिरडी आंदोलन केले.

जिवंतपणीच तिरडीवर जाण्याचे दुर्भाग्य गाळेधारकांच्या नशिबी…. ! जळगाव मनपा सारखा पालनकर्ता असल्यावर गाळेधारकांच्या नशिबी दुसरे तरी काय येणार…… ?

आपल्या लेकरांचा जीव घेणाऱ्या माता- पित्यांना आपण कुमाता म्हणतो ; त्यांना पकडून शिक्षा दिली जाते. परंतु गाळेधारकांचा नऊ वर्षे छळवाद मांडून त्यांना जिवंतपणीच मारायला निघालेल्या मनपा नावाच्या पालकाला कोण शिक्षा देणार ?

समोर मरण दिसत असेल तर कोणताही दूर्बल प्राणी जिवाच्या आकांताने लढतो ; त्यात त्याची मरण्याची ही तयारी असते हे मनपाने ध्यानात ठेवावे.

 आज तर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन आहे ; भविष्यात शेकडो खऱ्या तिरडया निघतील व त्याचे उत्तर जगाला मनपालाच दयावे लागेल.

उपोषण स्थळी सकाळी ९ ते १ चौब मार्केट मधील गाळेधारक वसीम काझी, अमित भावनानी, स्वप्निल शिनकर, बाबूलाल जैन, जावेद शेख उपस्थित होते. दुपारी १ ते ५ मजीद शेख, प्रकाश तिवारी, ललित मराठे, अनिल जगताप, हितेश शहा उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, रिजवान जागीरदार, प्रदीप श्रीश्रीमाळ, आशिष सपकाळे, विलास सांगोरे उपस्थित होते. उद्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी छत्रपती शाहु मार्केट तर्फे व्यर्थ न हो बलीदान आंदोलन करण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button