---Advertisement---
गुन्हे पारोळा

धक्कादायक : विवाहितेचा विनयभंग करून पतीला मारहाण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२२ । पारोळा शहरातील एका परिसरातील २० वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करीत तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 30T160214.720 jpg webp

शहरातील एका परीसात पतीसोबत वास्तव्यास असलेल्या २० वर्षीय विवाहिता दि. ३० रोजी पती घरी नसताना संशयित आरोपी चेतन सुरेश जगताप याच्या सोबत २ तरुण विवाहितेच्या घराबाहेर येवून दरवाजा वाजवून पतीचा नातेवाईक सांगत दार उघडायला लावला.यानंतर घरात घुसत विवाहीतेला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. पीडित विवाहितेने आरडा ओरड केली असता, विवाहितेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेने पतीला बोलविले असता पतीला या संशयित तीन तरुणांनी मारहाण केली.

---Advertisement---

या प्रकरणी संशयित आरोपी चेतन सुरेश जगताप, दादा चौधरी, बबलू पाटील, रा.पारोळा यांच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ.बापूराव पाटील हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---