---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे जळगाव शहर

धक्कादायक प्रकार : ईंटरनेट वरील प्रेयसी लग्न झाल्यावर निघाली त्रुतीयपंथी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली. तिच्याशी प्रेम झाले. मग लग्न झाले. मात्र त्यानंतर ती मुलगी तृतीयपंथी आहे. असे लक्षात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. गिरणा पंपीग रोड परिसरात राहणाऱ्या तरूणाशी लग्न करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिले आहेत.

onlain love jpg webp webp

जळगाव शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात २६ वर्षीय तरूण वास्तव्यास आहे. या तरूणाची फेसबूकवरून एका तरूणीशी ओळख झाली. आई-वडिल अपघातात वारले असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर ओळखीनंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच २९ एप्रिल २०२३ रोजी तरूणीने त्या तरूणाशी लग्न केले.

---Advertisement---

काही दिवसात हळूहळू त्या तरूणीच्या हालचाली वेगळ्या वाटल्याने तरूणाला स्पर्श न करू देत असल्याने, तरूणाची शंका वाढत गेली. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर डॉक्टराकडे तपासणीला घेवून गेले असता तृतीयपंथीयाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिला असल्याचे बनाव करणाऱ्या तृतीयपंथीने तरूणाकडे १० लाखांची मागणी केली.हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने जळगाव पोलीस अधीक्षक व रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवाय जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात देखील याचिका दाखल केली. न्यायालयात या प्रकरणावर कामकाज होवून न्यायालयाने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दिले आहे. न्यायालयात तरूणाकडून ॲड.केदार भुसारी यांनी बाजू मांडली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तृतीयपंथीने एका ॲपवर व सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या नावाने अकांऊट उघडले असल्याचे लक्षात आले. यामध्ये अनामिका, सोनू, दिव्या, सोनल या नावांचा समावेश होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---