---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे जामनेर

धक्कादायक : पेट्रोल टाकत जाळले दुकान

---Advertisement---

fire 11 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । जामनेर तालुक्यातील सावरला गावात बसस्थानकाजवळ असलेल्या किराणा दुकानाला चौघांनी पेट्रोल टाकत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. यावेळी या दुकानाचे मोठे नुकसान झाले. याबाबद पोलीस जामनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

---Advertisement---

अधिक माहिती अशी की, विकास नाना पाटील (वय-३१) रा. सावरला ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपल्या उदरनिर्वाह करतो. १५ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावातील मुकेश गजमल कोळी, अविनाश विश्वनाथ कोळी, प्रमोद नारायण पाटील आणि सागर भगवान पाटील सर्व रा. सावरला ता. जामनेर यांनी खोडसाळपणे विकास पाटील यांच्या किराणा दुकानावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

या आगीत सुमारे ११ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन सोनोने करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---