⁠ 
सोमवार, मे 20, 2024

बंदीवर अनैसर्गिक कृत्य करून धारदार पट्टीने वार ; जळगाव कारागृहातील धक्कादायक बातमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । जळगाव जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक बातमी असून खूनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीवर त्याच्या बॅरेकमधील इतर बंदीनी अनैसर्गिक कृत्य केलं. इतकंच नव्हे तर अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केला असता, त्या बंदीवर धारदार पट्टीने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. याबाबत जिल्हापेठ पोलिसात चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण असे गुन्हा दाखल केलेल्या कैद्यांचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

जळगाव जिल्हा कारागृहातील वर्ग २ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये असलेले बंदींनी त्याला बाथरुममध्ये घेवून जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुला बघुन घेईल जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी पहाटे चार वाजेच्या सुमारास तो बंदी झोपलेला असतांना त्याच बॅरेकमधील विक्की शिंदे याने त्याला उठवित अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील लोखंडी पट्टीने त्या बंदीच्या गळ्यावर वार केले.

गळ्यावर वार झाल्याने जखमी झालेला बंदी जमिनीवर कोसळल्यानंतर बंद्यांनी दिलेल्या धमकीला घाबरुन तो गळ्याला कापड बांधून झोपून गेला. या घटनेबाबत कारागृहातील बंदीने त्या जखमी बंदीची विचारपुस केली. त्याने घडलेल्या प्रकाराबाबत त्याला सांगितला. हा प्रकार कारागृह प्रशासनाला माहिती पडताच त्यांनी बंदीला कारागृहातील इतर बॅरेकमध्ये ठेवले.

दरम्यान, याप्रकरणी चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.