धक्कादायक : हिटरच्या ‘शॉक’ने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

मे 22, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । घरातील हिटरचा शॉक लागल्याने एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे २१ रोजी दुपारी ४.१५ वाजता घडली. दानिश युनूस पिंजारी (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

shock 3 jpg webp

पिंजारी हा तरुण आपल्या राहत्या घरात हिटरचा शॉक लागल्याने गंभीर जखमी झाल्याच माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. परंतु, तपासणी करुन डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत विनोद सलीम पिंजारी शिरसमणी यांनी दिलेल्या माहितीवरुन पाराेळा पाेलिसांत अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली आहे.या घटनेचा तपास प्रदीप पाटील करत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now