भुसावळ

धक्कादायक : हातमजुराची तापी पात्रात आत्महत्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । भुसावळ शहरातील तुलसी नगरातील ७०वर्षीय प्रौढाने तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, झांबरे यांनी आत्महत्या का केली? याचे ठोस कारण स्पष्ट होवू शकले नाही मात्र प्रतिकुल परीस्थितीत जगण्याचा सुरू असलेला संघर्ष व त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

नारायण तुलसीदास झांबरे (७०, तुलसी नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी घरात पत्नी झोपली असताना झांबरे यांनी तापी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, ही बाब लक्षात येताच अरुण उत्तम रंधे (राहुल नगर, भुसावळ) आदींनी धाव घेवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. साईसेवक पिंटू कोठारी यांनी घटनास्थळी धाव मदतकार्य केले. झांबरे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या पत्नीला मोठा मानसिक आघात झाला.

त्यांच्यावर तातडीने रीदम रुग्णालयात हलवण्यासाठी माजी नगरसेवक कोठारी यांनी धावपळ केली. मयत झांबरे यांच्या पश्चात पतनी, दोन विवाहित मुली व मुलगा असा परीवार आहे. या प्रकरणी अरुण रंधे यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.

Related Articles

Back to top button