---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा रावेर

धक्कादायक : चार दिवसाचे मृत अर्भक गटारीत टाकले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । रावेर तालुक्यातील रसलपूर या गावात चार दिवसाचे मृत अर्भक गटारीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

arbhak jpg webp webp

रावेर तालुक्यातील रसलपूर गावात रविवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील एका घरासमोरील गटारीत तीन ते चार दिवसांचे नवजात मेलेले अर्भकाला टाकून दिल्याचे समोर आले. हे अर्भकाची जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने उघड्या गटारीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

---Advertisement---

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील प्रविण धनके यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस नाईक जगदीश पाटील करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---