जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । सध्या धक्कादायक वृत्त रोजच झळकत असून आज पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका तालुक्यात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी एकाला रस्ता अडवून जुन्यवादाच्या कारणावरून बेदम मारहाण केला आहे. तसेच विषारी औषध देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आहे. याबाबत पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेंद्र शिवाजी उदागे (वय २८, रा.पाथर्डी जि. अहमदनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. योगेंद्र उदागे हे ह.मु. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. उदागे हे जेसीबीचे काम करून आपले उदरनिर्वाह करतात. दि.६ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी रमेश रामचंद्र धनगर, दिपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर सर्व (रा. मांडळ ता. अमळनेर) आणि किशोर धनगर (रा. फागणे ता.जि. धुळे) यांनी मिळून खेडीपासून ते गोवर्धन रस्त्यावर योगेंद्र याचा रस्ता अडविला.
दरम्यान, संशयित आरोपी रमेश रामचंद्र धनगर, दिपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर सर्व (रा. मांडळ ता. अमळनेर) आणि किशोर धनगर (रा. फागणे ता.जि. धुळे) यांनी जुन्यवादातून उदागे यांना मारहाण केली. तसेच विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
योगेंद्र शिवाजी उदागे (वय २८) यांनी या प्रकरणी मारवाड पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी रमेश रामचंद्र धनगर, दिपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर सर्व (रा. मांडळ ता. अमळनेर) आणि किशोर धनगर (रा. फागणे ता.जि. धुळे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहे.