---Advertisement---
गुन्हे भडगाव

धक्कादायक : ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार.. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी!

---Advertisement---

Bhadgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । विवाहितेवर अत्याचार करून अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार भडगाव शहारत उघडीस आला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 10T104930.183 jpg webp

शहरात ३० वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्य आहे. संशियत योगेश शिवाजी महाजन याने विवाहितेला त्याच्या दुकानात बोलावून जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच अत्याचाराचे व्हिडीओ देखील काढले. त्यानंतर व्हिडीओ तुझा पती, आईवडील व भाऊला पाठवून देण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार करत, इतकेच नव्हे तर विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून धमकी देत होता.

---Advertisement---

दरम्यान हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने त्यांनी  भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश शिवाजी महाजन याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---