---Advertisement---
एरंडोल गुन्हे

धक्कादायक! गॅस गिझरने १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू, एरंडोलातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल शहरातील १६ वर्षीय मुलाचा घरातील बाथरूममधील गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

jalgaon 2022 11 21T142640.939 jpg webp webp

(साई) यश वासुदेव पाटील (वय १६) असे मयत मुलाचे नाव आहे. यश हा शहरातील रेणुका नगरा मधील वास्तव्यात असलेले माध्यमिक शिक्षक व्ही.टी. पाटील यांचा मुलगा आहे. आज सोमवारी १०.३० वाजेच्या सुमारास घरातील बाथरूम मध्ये अंघोळीस गेला असता गॅस गळती झाल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. यश हा इयत्ता दहावीत रा.ती काबरे विद्यालयात शिकत होता तसेच तसेच व्ही टी पाटील हे सुद्धा त्याच शाळेत कार्यरत आहेत.

---Advertisement---

दरम्यान, बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूम मधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटली त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता ही घटना उघडीस आली. त्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. शिवसेना(उ बा ठा ) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा तो पुतण्या होत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---