जळगाव जिल्हाराजकारण
शिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्क नेतेपदी पुन्हा खा.संजय राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । शिवसेनेचे खासदार आणि जेष्ठ नेते संजय राऊत यांनी पुन्हा उत्तर महाराष्ट्र शिवसेना विभागीय संपर्क नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
खा.संजय राऊत हे गेल्या वेळी देखील उत्तर महाराष्ट्र शिवसेना विभागीय संपर्क नेते होते. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची होणारी वाटचाल लक्षात घेता पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्याचा खा.राऊत यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. आगामी निवडणुका आणि सध्या शिवसेनेला असलेले पोषक वातावरण लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.