शिवसेनेच्या नादी लागू नको भौ.. लई महागात पडेल तुला…! थेट इलॉन मस्कला धमकी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

मे 3, 2022 2:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२२ । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याची जगभरात मोठी चर्चा झाली. इलॉन मस्क हे ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या अनेक ट्विट्सची सर्वत्र चर्चा होत असते. पहिल्यांदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देणारे एक ट्वीट करण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच या ट्वीटला दोन रिप्लाय दिले. पहिला रिप्लाय होता, ‘हाऊ स्ट्रेंज’ आणि दुसरा रिप्लाय होता, ‘वेल, बॅक टू वर्क ’. या ट्विट्सवर मोठी चर्चा झाली होती. आता त्यांच्या एका ट्विटवरुन त्यांना थेट शिवसेनेनेच्या नादी न लागण्याची धमकी देण्यात आली आहे.

shivsena elon musk and parody tweet

इलॉन मस्क यांनी मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एक ट्विट केले. यात झोपलेला एक वाघ दिसत असून त्या फोटोवर २०२२ हिअर वूई गो… असे लिहिलेले आहे. तर फोटोला अ‍ॅज आय वॉज सेईंग असे कॅप्शन देण्यात आले आहे. गंमत म्हणजे या फोटोत एका व्यक्तीचा हात दिसत असून त्यात वाघाच्या अंडाशयाला टिचकी मारतांना दिसत आहे. या फोटोवर पहिल्या १२ तासात ३८.१ हजार जणांनी कमेंट केल्या असून ८० हजारपेक्षा जास्त जणांनी यास रि ट्विट केले आहे तर तब्बल ८ लाख ७१ हजार लोकांनी यास लाईक केले आहे.

Advertisements

या ट्विटवर फैजल खान नावाच्या एका युजरने शिवसेनेच्या नादी लागू नको भौ.. लई महागात पडल तुला…! अशी मजेशिर कमेंट केली आहे. त्यावर देखील अनेकांनी मजेशिर कमेंट केल्या आहेत. या ट्विटचे स्क्रिनशॉन देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Advertisements

इलान मस्कने हा फोटो नेमका कशासाठी ट्विट केला, हे स्पष्ट नसले तरी शिवसेना त्यांच्या लोगोसाठी वाघाचा फोटो वापरत असते. यामुळे युजर्सनी त्याचा संबंध थेट शिवसेनेशी जोडला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now