---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

शिवसेना मनपात ६-६ महिन्यांचे उपमहापौर देणार असल्याची चर्चा!

kulbhushan patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ – शहर मनपात सत्तांतर करून भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून शिवसेनेने मनपा काबीज केली. महापौरपदी जयश्री महाजन यांना तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांना संधी देण्यात आली. शिवसेनेला दोन महिने होत नाही तोच प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून उपमहापौर दर सहा महिन्यांनी बदलण्यात येणार असल्याची चर्चा सध्या मनपात रंगत आहे.

kulbhushan patil

जळगाव मनपातील भाजपचे २७ नगरसेवक फोडून शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पुन्हा ५ नगरसेवक सेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच जळगाव मनपात उपमहापौर दर पाच महिन्यांनी बदलविण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नवग्रह मंडळातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शिवाजीनगर पुलाचे विद्युत खांब शिफ्टिंग करण्याचा मुद्दा समाज माध्यमातून उचलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापौर-उपमहापौर यांच्याकडून त्यावर तात्काळ खुलासा न आल्याने वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे.

---Advertisement---

नवग्रह मंडळातील काही सदस्य आणि शिवसेनेतील जुनेजाणते नगरसेवक पदाची आस लावून असल्याने सामाजिक समतोल साधण्यासाठी उपमहापौरपदी प्रत्येकाला सहा-सहा महिने संधी दिली जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. उपमहापौरपदासाठी सध्या सुरेशदादा गटातील निष्ठावान सदस्य नितीन बरडे, एकनाथराव खडसेंचा गटातील सदस्य सुनील खडके, अभ्यासू आणि मराठा समाजाचे सदस्य नवनाथ दारकुंडे, कायदेशीर ज्ञान असलेले ऍड.दिलीप पोकळे, कोळी समाजातील जेष्ठ सदस्य दत्तात्रय कोळी आणि अनुसूचित जाती-जमातीचे नवीन नेतृत्व असलेले सदस्य चेतन सनकत यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजपकडून प्रत्येकाला संधी देण्यासाठी आखलेला डाव फसला असला तरी सेनेकडून तशी चूक होणार नाही याची खात्री आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जेष्ठ नेते आणि सदस्य नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून असले तरी उपमहापौर ६ महिन्यांनी बदलणार ही चर्चा मात्र रंगत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---