---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा जळगाव शहर

शिवसेनेच्या बंडखोरांचा हलकटपणा, पक्षाला दिलेली रुग्णवाहिका मागवली परत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । राज्यात शिवसेनेत फूट पडली असताना जळगावात आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. राज्यात शिवसेना आघाडीची सत्ता असताना आरोग्य विषयक सेवेवर त्यांनी भर दिला होता. जळगाव महानगर शिवसेनेसाठी तत्कालीन पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील पाटील यांनी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनची रुग्णवाहिका दिली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील एक गट वेगळा झाला असून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जळगावचे आ.गुलाबराव पाटील हे देखील आहेत. सत्तांतर होताच पालकमंत्र्यांच्या गटाकडून महानगर शिवसेनेला दिलेली रुग्णवाहिका पुन्हा परत मागून घेण्यात आली आहे. मोठ्या नेत्याकडून असा हलकटपणा केला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ambulance jpg webp

जळगावात शिवसेनेचा चांगलाच दरारा होता. शहर मनपात भाजपचे नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने आपला महापौर बसविला होता. जळगाव महानगर शिवसेनेला आरोग्य विषयक मदतकार्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जळगावसाठी एक रुग्णवाहिका देण्यात आली होती. हि रुग्णवाहिका डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शिवसेनेसाठी देण्यात आली होती. गुलाबराव पाटील यांनी हे शिवसेना महानगरला दिली होती. शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर आणि दिनेश जगताप हे दोन्ही रुग्णवाहिकेचे काम पाहत होते. शिवसेनेच्या रुग्णवाहिकेचा उपयोग करून अनेकांना वेळीच मदत उपलब्ध झाली तर अनेकांचा जीव देखील वाचला होता.

---Advertisement---

नुकतेच राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे गट तयार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व सेना आमदार सहभागी झाले आहेत. शिवसेनेतील पदाधिकारी देखील हळूहळू शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटाला पाठिंबा देत आहे. आज शुक्रवारी देखील युवासेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देत गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले. एकीकडे आ.पाटील यांचा गट जिल्ह्यात मजबूत होत असताना त्या गटाकडून शिवसेना महानगरला देण्यात आलेली रुग्णवाहिका परत मागवून घेण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय व महाविद्यालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आ.गुलाबराव पाटील, संजय सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मान्यवरांचे फोटो तसेच दोघांचे संपर्क क्रमांक असलेले स्टिकर चिटकवण्यात आले होते. पाटील गटाकडून रुग्णवाहिका ताब्यात घेताना सर्व स्टिकर काढून घेण्यात आले आहे. पक्षीय राजकारण करताना आरोग्य सेवेच्या बाबतीत देखील असे होत असेल तर यापेक्षा दुर्दैवी जळगावसाठी काही असूच शकत नाही, असे मत काही शिवसैनिकांनी व्यक्त केले.

गुलाबराव पाटील पालकमंत्री असताना त्यांनी शिवसेना महानगरसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली होती. यातून शिवसेनेचे जनसेवेचे कार्य केले. मात्र, गुलाबराव पाटील आता शिंदे गटात गेले असल्यामुळे त्यांनी आता ही ॲम्बुलन्स पुन्हा मागून घेतली आहे.
शरद तायडे, शिवसेना महानगर प्रमुख

रुग्णवाहिका वापरणाऱ्यांच्या उलट्या बोंबा
खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांच्याकडे रुग्णवाहिका सोपविण्यात आली होती. आ.पाटील यांनी ती रुग्णवाहिका शहरासाठी सुपूर्द केली होती. रुग्णवाहिकेवर प्रशांत सुरळकर एकहाती ताबा करून बसला होता. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून केलेल्या सेवेची कोणतीही माहिती तो देत नव्हता. स्व.बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आमचे काही प्रामाणीक शिवसैनिक कार्यरत आहेत. त्या शिवसैनिकांनी मागणी केल्याने रुग्णवाहिका त्यांच्याकडे सोपवायची होती, त्यामुळे ती आम्ही मागून घेतली. आ.गुलाबराव पाटील यांना याबाबत काहीही माहिती नाही. रुग्णवाहिकेवरील स्टिकर त्यांनीच काढून घेतले, अशी माहिती दिनेश जगताप यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’सोबत बोलताना दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---