⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचं जळगावात जोरदार प्रत्त्युतर ; म्हणाले…

चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचं जळगावात जोरदार प्रत्त्युतर ; म्हणाले…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ ।  शिवसेनेला पिंजऱ्यातला वाघ असं म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तेव्हापासून भाजपची वाघाशी मैत्री होती. मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो. वाघ हा वाघ असतो. मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असं असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जिल्हा दौऱ्यावर आले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीनंतर खा.राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रकात सोनवणे, आमदार किशोर पाटील यांच्यासह लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणे, गावातला शिवसैनिक काय करत आहे, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे.

शरद पवार हे या सरकारचे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी सूतोवाच केले आहे, ती या राज्यातल्या जनतेच्या मनातली भावना आहे. निवडणुका या एकत्र लढाव्या लागतील. आजची राज्याची व्यवस्था अशीच पुढे न्यायची असेल तर पवार साहेब जे सांगत आहेत, त्यानुसार निवडणुका एकत्र लढून पुढे जावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

नाना पटोले जर स्वबळावर निवडणुका लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांचा पाठींबा असेल, असंही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

‘आम्ही नेहमीच मैत्रीसाठी तयार असतो. पण वाघाचे म्हणाल तर आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर होता, तोपर्यंत आमची मैत्री होती,’ असं त्यांनी म्हटलं होतं

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.