⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटीलांचा युवासेना – शिवसेने तर्फे निषेध

महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटीलांचा युवासेना – शिवसेने तर्फे निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तसेच महिलांचे अपमान करणारे वक्तव्य केल्याने युवासेना, शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे नेहरू चौक जळगाव येथे निषेध करण्यात आला.

यावेळी गुलाबराव पाटील यांचे फोटो असलेले बॅनरचे दहन करून तसेच “महिला डॉक्टरांचं अपमान करणाऱ्या गुलाबराव पाटीलचं करायचं काय, खालती डोके वरती पाय”, “पन्नास खोके रिकामे डोके”, “50 खोके खोके, माजले बोके”, अशाप्रकारच्या विविध घाषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याने अश्या प्रकारचे महिलांचे अपमान करणारे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. गद्दार गुलाबराव पाटील यांनी त्वरित महिलांची माफी मागावी अशी भावना युवासैनिक – शिवसैनिक यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, समन्वयक अंकुश कोळी उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड जीलाणी शेख शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी, नीलू इंगळे, निता सांगोले, मनीषा पाटील, विमल वाणी, गायत्री सोनवणे, शिला रगरे, अन्नपूर्णा बनसोडे, प्रमिला बारी, अल्पसंख्यांक आघाडीचे झाकीर पठाण, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पुनम राजपूत, अमित जगताप, जय मेहेता, अभिजित रंधे, अमोल मोरे, महेश ठाकूर, श्रीकांत आगळे, अंकुश कोळी, फरीद खान, ईश्वर राजपुत, किरण भावसार, उमेश चौधरी, प्रीतम शिंदे, मोहसीन पिंजारी मोहसीन शेख आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह