जळगाव शहरराजकारण

.. तर माझा कार्यक्रम आटोपला असता ; बंडखोरीबद्दल गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । जवळपास ४ महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या बंडखोरीबद्दल शिंदे गटाचे नेते आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचं म्हणतात. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आतादेखील एक धक्कादायक दावा केलाय
.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.“उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे सचिव, खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं”, असं देखील गुलाबराव म्हणाले. “असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो”, असंदेखील विधान त्यांनी केलं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button