महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी ; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणि आज दुपारी पत्रकार परिषदेत केली. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे,. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. शिंदे यांना ४० हुन अधिक आमदारांनी पाठींबा दिला होता. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनतर एक एक पदाधिकारी शिंदे गट सामील होत असल्याने शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. गळती रोखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहे.