⁠ 
शनिवार, मे 4, 2024

Eknath Shinde Updates : गुजराथी भाषेत व्हायरल होतेय फुटलेल्या १९ आमदारांची यादी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधान परिषद निवडणूक आटोपताच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडलेली आहे. नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) यांच्यासह जवळपास २५ आमदार आणि काही मंत्री नॉट रिचेबल झाले आहेत. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यानंतर एकनाथ शिंदे देखील बंड पुकारतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके कोण आहेत याची अधिकृत माहिती समोर येत नसली तरी गुजराथी भाषेत फुटलेल्या १९ आमदारांची एक यादी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (ShivSena MLA Viral List in Gujrati )

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला असल्याची माहिती खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपवर खा.राऊत यांनी अनेक आरोप केले असून महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी गुजरातमधून सूत्रे हालत आहे. शिंदे गटाचा पाहुणचार करण्यासाठी जबाबदारी सोपविलेले खा.सी.आर.पाटील हे कुणाच्या जवळचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. राजस्थान, मध्यप्रदेश सारखा पॅटर्न राज्यात लागू होणार नाही, असेही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप कोण आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी मराठवाड्यातील ६ तर पश्चिम महाराष्ट्रातील ५ आमदार शिंदे यांच्यासोबत म्हटले जाते.

हेही वाचा : Eknath Shinde Updates : शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील आहेत कुठे, मुंबई का गुजरात?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत तीन मंत्री देखील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर गुजराथी भाषेतील एक यादी व्हायरल होत असून संपर्काबाहेर असलेले हेच आमदार असल्याचे म्हटले आहे. १९ आमदारांची यादी असून ती कितपत खरी आहे हे अद्याप सांगणे कठीण आहे. पहा कोणाचा आहे त्या यादीत समावेश…

कोणते आमदार संपर्काबाहेर आहेत?

  1. एकनाथ शिंदे – कौपरी
  2. अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद
  3. शंभूराज देसाई – सातारा
  4. संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद
  5. उदयाससह राजपूत – कन्नड – औरंगाबाद
  6. भरत गोगावले – महाड – रायगड
  7. नितीन देशमुख – बाळापूर – अकोला
  8. अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली
  9. विश्वनाथ भोईर – ल्यान पश्चिम
  10. संजय गायकवाड – बुलढाणा
  11. संजय रामुलकर – मेहकर
  12. महेश सिंदे – कोरेगाव – सातारा
  13. शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर
  14. प्रकाश आबिटकर – राधापुरी – कोल्हापूर
  15. संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ
  16. ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद
  17. तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद
  18. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
  19. रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद