⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | पर्यटन | जळगाव जिल्ह्यापासून जवळच असणारे महादेवाचे जागृत देवस्थान शिरवेल महादेव

जळगाव जिल्ह्यापासून जवळच असणारे महादेवाचे जागृत देवस्थान शिरवेल महादेव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । आज ९ ऑगस्ट श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे. हिंदुधर्मात श्रावण महिन्यातील भगवान श्री शंकरांच्या आराधनेला फार महत्त्व आहे. या महिन्यात भाविक मोठ्या श्रध्येने भगवान शिवाची आराधना करतात. याचनिमित्ताने महाराष्ट्र सीमेलगत असलेले मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील शिरवेल येथील स्वयंभू महादेवाच्या मंदिराविषयी आपण आज जाणून घेऊ…

जळगाव जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या २२ किलोमीटर असलेल्या मध्यप्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यात शिरवेल येथे महादेवाचे जागृत देवस्थान आहे. या मंदिराला फार जुने अध्यात्मिक महत्त्व असून भाविकांची मोठी श्रद्धा आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले शिरवेल महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात येथील भक्त दरवर्षी मोठी गर्दी करत असतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे.

shirvel-mahadev-waterfall
शिरवेल महादेव परिसरातील मनमोहक धबधबा

शिरवेल महादेव येथे जाण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतून अतिशय खडतर प्रवास करून जावे लागते. पर्वत रांगांच्या मध्यवस्तीत वसलेले व आदीवासी बहुल भागात हे स्थान आहे. इथल्या मनमोहक व नयनरम्य असा परिसर भाविकांना व पर्यटकांना आकर्षित करतो. या परिसरातील पर्वतरांगांमधील सतत कोसळत असलेल्या  धबधबामुळे प्रवासाचा सर्व थकवा दूर झाल्याशिवाय राहत नाही.

शिरवेलची आख्यायिका पुराणाच्या मान्यतेनुसार याठिकाणी रावणाने शिवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. रावणाने आपले दहाशिर महादेवाला अर्पण केल्याची आख्यायिका आहे. त्यावरूनच या स्थानाचे नाव सिरवेल असे पडले असून येथे असलेली शिवलिंग ही स्वयंभू असल्याने याठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. पहाडाच्या खालून अतिशय खडतर मार्गाने जाऊन पहाडातील साठ फूट वर असलेल्या गुंफेत स्वयंभू महादेवाचे शिवलिंग आहे. या परिसरातील सातपुड्याचा नयनरम्य असा परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याने येथे येणारा प्रत्येक जण निसर्गात रमत असतो.

कोरोना निर्बंध संपल्यानंतर प्रत्येकाने भेट द्यावे असेच हे ठिकाण असून एकदा आवश्य भेट द्या.

author avatar
Tushar Bhambare