जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । पारोळा तालुक्यातील येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सन २०२२-२०२७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत संत उदासी बाबा शेतकरी विकास पॅनचे तेरा पैकी नऊ जागां प्रचंड बहुमताने विजयी झाल्या.
मागच्या काळात विकासोवर राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे यावेळी शिवसेनेने बिनविरोध निवडीचा प्रस्ताव ठेवला होता तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी व पॅनलप्रमुख यांनी मान्यही केला होता त्यात १३ पैकी ७ जागा राष्ट्रवादी ला व ६ जागा शिवसेनेला देण्याचे दोन्ही गटांकडून ठरविण्यात आले व चेअरमनपद अडीच वर्ष याप्रमाणे सर्व गोष्टी ठरल्या.तद्नंतर दोन्ही गटाकडून एकूण तेरा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याबाबत एकमत झाले.परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्ण तेरा नामनिर्देशन पत्र दाखल केले व राष्ट्रवादीचे ऐनवेळी फक्त दहा उमेदवारांचे अर्ज घाईघाईने दाखल केले.व उर्वरित अर्ज वेळ संपली असा आक्षेप घेत राष्ट्रवादीचे अर्ज दाखल होऊ दिले नाहीत.म्हणून तेरा विरुद्ध दहा अशा लढतीत राष्ट्रवादीची अनुसुचित जाती या मतदारसंघातील एक जागा बिनविरोध निवडून आली म्हणून 13 विरुद्ध 10 अशी लढत झाली व त्यात राष्ट्रवादी पॅनेलने तब्बल 9 जागांवर प्रचंड मतांनी बाजी मारली व विकासोत राष्ट्रवादी गटाची सत्ता अबाधित राहिली.
या ऐतिहासिक निवडणुकीत शिवसेना गटातील प्रमुख पदाधिकारी यांनी बिनविरोध निवड करू असे सांगत विश्वासघात करत निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी गटाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची करत सभासद मतदारांसमोर त्यांचा भांडाफोड करत आपल्याशी विश्वासघात व गद्दारी करणाऱ्या पॅनलला आपण निवडून देणार का अशा पद्धतीने एकसंघ प्रचार यंत्रणा राबवून सर्वांना विश्वासात घेतलं. अशा या ऐतिहासिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत संत उदासी बाबा शेतकरी विकास पॅनलचे पुढील उमेदवार विजयी झाले. निलाबाई धर्मा माळी, विश्वनाथ हिलाल पाटील, संभाजी शिवबा पाटील, भगवान संतोष पाटील,भास्कर(भोला) दिनकर पाटील, गोकुळ महादू पाटील, तुकाराम अंबू वंजारी, युवराज रामदास गोपाळ, बापू ताराचंद पवार विजयी झाले.
विजयी उमेदवारांचे माजी पालकमंत्री डॉ सतिश पाटील जि.प सदस्य रोहन पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेले पॅनल प्रमुख संतोष महाजन,माजी सरपंच रोहिदास पाटील माजी विकासो चेअरमन किशोर पाटील, माजी सरपंच बालू पाटील,मनोहर पाटील,जितेंद्र पाटील,सतीश बोरसे,अरुण पाटील,रामराव पाटील,संजय पाटील,दादाभाऊ पाटील,निंबा महाजन,भिमराव वंजारी,हेमराज पाटील,संदीप पाटील,शांताराम महाजन,गोकूळ सैनिक अण्णा गोपाळ, लोटन बाविस्कर,मगन वंजारी विकासाचे माजी चेअरमन संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी पॅनल निवडण्यासाठी जीवाची बाजी लावली यांच्यामुळे हा विजय मिळाला असून हा आमचा विजय नसून हा जनतेचा विजय आहे असे विजयी उमेदवारांनी सांगितले.