⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शिंदे वि ठाकरे : शिवसेना कोणाची ? प्रकरण न्यायालयात जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज | शिवसेना कोणाची?| शिवसेना शिंदे गटाची कि उद्धव ठाकरे यांची ? आता हा वाद न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष असून त्यांना सरकारने महापुरुष जाहीर केला आहे. महापुरुष हे कोणत्या एका व्यक्तीचे नसतात यामुळे शिवसेना आमची आहे. आता शिवसेना आम्ही आमच्या पद्धतीने वाढवू, अशी प्रतिक्रिया आ गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत. त्यांच्यावर कोणत्याही एका व्यक्तीचा हक्क असू शकत नाही. शिवसेना आमच्यावर वीप बजावते आहे. मात्र त्या 35 वर्षात आम्ही शिवसेना कशी वाढवली हे आम्हाला माहीत असून आमच्यावर वीप बजावण्याचा अधिकार शिवसेनेला नाही शिवसेना आमची आहे.

याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, याआधी काही दिवसांपासून माझे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मी जे बोललो ते खरं बोललो, मी बोललो ते शिवसेनेसाठी बोललो. यापुढे शिंदे गटाच्या शिवसेनेचे व्हिडिओ देखील व्हायरल होतील. पुढे बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मला खूप दिलं. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मी काही वाईट बोलणार नाही. ठाकरे कुटुंब आमच्या मनात आहे.