⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

.. हा मतदारसंघ आम्हालाच हवा ; जळगावात शिंदे गटाने ठोकला दावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२४ । लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. या निवणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून राज्यातील महायुतीमधील पक्षांकडून मतदारसंघावर दावे ठोकले जात आहे. यातच जळगाव मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. हा मतदारसंघ आम्हालाच हवा आहे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करु, ते भाजपच्या श्रेष्ठींशी बोलतील असं जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी म्हटलं

संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुनील चौधरी रविवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी अजिंठा विश्रामगृहावर प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील आदी उपस्थित होते. या मतदारसंघात आढावा घेतला असता आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्य आमचे आहे. अनेक संस्था आमच्याकडे आहेत. लोकसभेसाठी आमच्यासाठी पुरक वातावरण आहे. पक्षवाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

प्रत्येक कुटूंबात थोडं अधिक कुरबुरी असतात. तसंच भाजप व शिंदे गटात थोडं रडगाणं, दुजाभाव आहे. मात्र आमच्यात, तक्रारी वाद नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून कुरबुरी दूर करण्याचा प्रयत्न करु. इच्छा प्रकट करणे गैर नाही. आमची मागणी आहे की,जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्यावा. काही मतदार संघात भाजप दुसरी टीम तयार करीत आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यात लक्ष घालतील. सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत असल्याचे चौधरी म्हणाले.