गुरूवार, जून 8, 2023

खान्देशात ‘या’ ठिकाणी शिंदे – भाजप येणार आमने सामने

जळगाव लाईव्ह न्यूज : ४ एप्रिल २०२३ : हिंदुत्वासाठी राज्यात आणि केंद्रात एकत्र आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप खान्देशात एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. यामुळे आता आगामी निविडणुकीची रंगत अधिकच वाढणार आहे.

अधिक माहिती अशी कि, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये शेवटच्या भाजप व शिंदे गटाच्‍या उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. यामुळे निवडणुक रंगतदार होणार आहे.

अधिक माहिती अशी कि, नंदुरबार बाजार समिती शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यात आहे. तर हि बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप नेते आणि पालकमंत्री विजयकुमार गावित हे सर्व ताकद पणाला लावत आहेत. अजून महत्वाची बाब म्हणजे खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित आणि मंत्री विजय गावित यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.

बाजार समितीच्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात चांगलीच चुरस पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार बाजार समितीत ९३ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.