⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

शेंदुर्णीला कृषी सहाय्यकास राजकीय पुढारींकडून मारहाण!

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । आतापर्यंत आपण राजकीय पुढाऱ्यांकडून लोकांना मारहाण करण्यात आल्याचे व्रत वाचले तथा ऐकले असेल. परंतु, शेंदुर्णी येथे चक्क कृषी सहाय्यक अधिकारी कन्हैय्या प्रकाश महाजन यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी महाजन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मारहाण करण्याऱ्या तिघांविरुद्द पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कन्हैय्या प्रकाश महाजन (वय 38, रा. हिंगणे ता. जामनेर हु.मु. आनंद नगर, प्लट न. 101, जामनेर) हे येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाजन यांनी म्हटले आहे की, मी सुमारे 06 वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जामनेर येथे कृषी सहाय्यक या पदावर नेमणुकीस असून सद्या माझ्या कडे कृषी पर्यवेक्षक पहुर -1 व 2 चा अतिरिक्त पदभार आहे. मी जामनेर तालुक्यातील शेतकरी यांना शेतीविषयक योजना बाबत माहीती देवुन त्यांची अंमलबजावणी करतो.

तालुका कृषी अधिकारी, जामनेर यांनी त्यांचे कडील आदेश जा.क्र./ताकृअ/तंत्र/जिनिंग तपासणी / आदेश/1414/2022 जामनेर दि. 29.08.2022 अन्वये जामनेर तालुक्यातील जिनिंग मिल तपासणी करण्याचे लेखी आदेश दिल्याने त्यानुसार तालुक्यातील जिनिंग मिलांना भेटी देवून आदेशाप्रमाणे तपासणी चा अहवाल कार्यालयास सादर करतो. दि. 31 रोजी मी सकाळी 11.30 वा. चे सुमारास शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्स या जिनिंग मिलला तपासणी कामी भेट देण्यास शेंदुर्णी गांवातील माझ्या ओळखीचा रोहीत धनराज चव्हाण याचेसोबत गेलो असता तेथे जिनिंग मध्ये गेटने प्रवेश करून तेथील कर्मचारी यास मी माझा परीचय त्यास देवुन तुमची जिनिंग मिल तपासणी साठी आलो आहे तरी जिनिंगचे मालक आहे काय बाबत विचारले. असता तेव्हा त्या कर्मचा-याने मला जिनिंगचे मालक गोविंद मुरलीधर अग्रवाल है ऑफिस मध्ये आहे असे सांगीतल्याने मी सदर जिनिंगचे ऑफिस चे जवळ गेलो त्यावेळी सदर ऑफिस मधुन नितीन गोविंद अग्रवाल हा आला तेव्हा त्याने तुम्ही कशासाठी आले आहे असे मला विचारले असता मी त्यास सांगीतले की,

मी जामनेर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातुन आलो असुन त्यांना मी माझे नाव सांगुन माझे कडील वरील संदर्भीय पत्रान्वये तुमच्या जिनिंग मिलची तपासणी करणे साठी आलो आहे असे सांगीतले असता तेव्हा ते मला बोलले की, तुम्ही कसे काय आत आले तुम्हाला कोणी सांगीतले आत यायचे असे बोलला तेव्हा मी त्यांना सांगीतले की, तुम्ही सी. एस. आर. फंडातुन फेरोमन ट्रॅप व ल्सुर्स घेवून ते बसविले आहे काय याबाबत मला पाहुन खात्री करायची आहे व तसा अहवाल कार्यालयास सादर करायचा असल्याने तुम्ही मला तुमच्या जिनिंग मध्ये लावलेले फेरोमन टूप व त्सुर्स दाखवा असे मी त्यांना समजावुन सांगीतले असता त्यांनी माझ्यावर ओरडुन आम्ही मालक असुन आता आमचे हातात सत्ता आहे आम्ही राज्य चालवित आहोत असे बोलत असतांना त्याचा आवाज ऐकुन ऑफिस मधुन गोविंद मुरलीधर अग्रवाल व त्यांचा मुलगा निलेश गोविंद अग्रवाल असे माझ्या अंगावर धावुन आले व मला तिघांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली मी त्यांना सरकारी कर्मचारी आहे मी वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे फक्त तपासणी करणे साठी आलो आहे असे सांगित होतो परंतु ते माझ्या काही एक ऐकून न घेता मला मारहाण करुन तु जिनिंग मध्ये आलाच कसा आमच्या जिनिंग मध्ये महीला असतात. पैसे पडलेले असतात तु कशी नोकरी करतो असे म्हणुन तुझ्या विरुध्द खोटे गुन्हे दाखल करून तुला नोकरीवरूनच काढतो असे म्हणुन तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

सदर वेळी माझ्या सोबत असलेला रोहीत धनराज चव्हाण याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी रोहीत यास तु मध्ये बोलु नको बाजुला हो असे म्हणाल्याने रोहीत बाजुला झाला. मला मारहाण होत असल्याने मी तालुका कृषी अधिकारी श्री चोपडे साहेबांना माझे फोनवरून फोन लावून त्यांना घडलेली हकीगत सांगीतली. तेव्हा नितिन अग्रवाल याने माझ्या हातातील मोबाइल हिसकावुन स्वतः जवळ घेवुन चोपडे साहेबांशी देखिल अरेरावीने बोलून फोन कट केला व माझ्या हातात परत दिला. त्यानंतर मी त्यांना विनवण्या करून सदर ठिकाणाहून कसाबसा बाहेर निघालो. त्यानंतर मी जामनेर येथे आमचे कार्यालयात गेलो तेव्हा तेथे तालुका कृषी अधिकारी श्री अभिमन्यु चोपडे, मंडळ अधिकारी कु. निता घारगे, लिपिक अश्विन आहीरे, तंत्र सहाय्यक सुनिल गायकवाड असे कार्यालयात हजर असतांना त्यांना मी वरील घटनेबाबत सविस्तर माहीती दिली.

त्यानंतर मी सदर प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी पहुर पोलीस स्टेशनला आलो असता व मला सदर मारहाणीत छातीवर गळ्यावर मुका मार लागून छातीवर खरचटल्याच व्रण असल्याने पोलीसांनी मला मेडीकल मेमो दिला मी पहुर येथील ग्रामीण रुग्णालयातून उपचार घेवुन पोलीस स्टेशनला आलो असून माझे शासकीय कामात अडथळा निर्माण करून माझ्या अंगावर धावून येवुन मला मारहाण, शिवीगाळ, जिवे ठार मारण्याची धमकी देणारे इसम नामे 1) नितीन गोविंद अग्रवाल, 2) गोविंद मुरलीधर अग्रवाल, 3) निलेश गोविंद अग्रवाल तिघे रा. शेंदुर्णी ता. जामनेर अशांचे विरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 353, 332, 504, 506, 34 नुसार तक्रार दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.