⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

वादळी पावसाचा तडाखा ! जामनेर तालुक्यात साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून जामनेर तालुक्यात रविवारी वादळी वारा गारपिटीसह पाऊस झाल्याने या पावसाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात घडलीय असून या घटनेमुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

काय आहे घटना?
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गारपिटीसह वादळी पाऊस तडाखा देत आहे. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दरम्यान, रविवारी पिंपळगाव आणि नांदगाव परिसरात शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळाच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळी वाऱ्यांचा तडाखा जोरदार असल्याने आणि कोणताही आडोसा बाचावासाठी जवळ नसल्याने या मेंढ्या वादळी वाऱ्यात सापडल्या.

हा तडाखा त्या सहन करू न शकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी, मागणी त्यांनी केली आहे.