जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । भारत पाकिस्तानमधील तणावामुळे गेल्या आठवड्यात काही सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. मात्र आता भारत-पाक युद्ध थांबल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. आज सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २,२०० अंकांनी तर निफ्टी ५० निर्देशांक ६५० हून अधिक अंकांनी वाढला. मुख्यतः मिडकॅप शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे.

भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. प्रत्येक गोष्टीवर युद्धाचा परिणाम पाहायला मिळाला. युद्धाच्या काळात शेअर मार्केटमध्ये मंदी पाहायला मिळाली. परंतु आज बऱ्याच दिवसांनी शेअर मार्केट हिरव्या रंगामध्ये उघडला आहे.
शेअर मार्केट आज वाढीसह उघडला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बीएसई सेन्सेक्स २२०० पेक्षा जास्त अंकांनी वाढला. सकाळी १० वाजता हा शेअर २,२४१.५५ अंकांनी वाढून ८१,६९६.०२ वर व्यव्हार करत होता. याचसोबत निफ्टी ५० मध्येही वाढ झाली आहे. निफ्टी ६९६.१५ अंकांनी वाढून २४,७०४ वर व्यव्हार करत होता.आज सगळ्याच शेअर्स तेजीत व्यव्हार करत आहेत.
बीएसई (BSE) लिस्टेड कंपन्यांचे भांडवल ११.१ लाख कोटी रुपयांनी वाढून ४२७.४९ लाख कोटी रुपये झाले आहे. अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. मेडिसिन क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये आज वाढ पाहायला मिळाली आहे.