⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

भारतीय शेअर बाजार नव्या शिखरावर! सेन्सेक्स-निफ्टीने तोडले आतापर्यंत सगळे रेकॉर्ड

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । भारतीय शेअर बाजारात सध्या उसळी पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे. दरम्यान,  सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिकस उसळण घेतली.

बुधवारी भारतीय शेअर बाजाराचा दिवस ऐतिहासिक ठरला असून काल सेन्सेक्सने पहिल्यांदाच 64,000 अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 19,000 अंकाचा टप्पा पार केला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बुधवारी 2.02 लाख कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, आज गुरुवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी सुरू केली, सकाळी 11.15 वाजेपर्यंत सेन्सेक्स 499 अंकाच्या वाढीसह 63915.42 व्यवहार करत आहे. तर निफ्टी 154.70 वाढीसह 18972 व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील ही तेजी गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारी ठरली आहे.