जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । आज देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून यात कोण बाजी मारणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला. बाजाराच्या सुरुवातीनंतर काही तासातच सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये मोठी घसरण झालीय आहे.
जस जसे निकालाचे काल हाती येत आहे तसे शेअर बाजारात घसरण होत असल्याचं दिसतेय. सकाळी 11.45 वाजेला सेन्सेक्स 3,472.38 अंकाने घसरून 72996.40 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी 1,113.25 अंकाने घसरून 22150 वर पोहोचला आहे.
यापूर्वी काल शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ झाली होती. निकालाच्या एक दिवसापूर्वी बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने 2507 अंकाने वाढून 76,468 वर उसळी घेतली होती दुसरीकडे निफ्टी 733.20 अंकाने वाढून 23,263अंकांवर बंद झाला होता. यामुळे निकालाच्या दिवशी शेअर बाजारात काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मात्र आज बाजाराच्या सुरुवातीलाच मोठी घसरण झाली. जस जसे बहुमताचे चित्र स्पष्ट होईल, तसा आज मंगळवारी शेअर बाजार रंग दाखवेल.