जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. दरम्यान, बाजार उघडताच सेन्सेस आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली होती. मात्र, व्यवहाराअंती सेन्सेक्स 98.00 अंकांनी किंवा 0.18% घसरून 53,416.15 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 28.00 अंकांनी किंवा 0.18 टक्क्यांनी घसरून 15,938.65 अंकांवर बंद झाला.
सकाळी बाजाराची स्थिती कशी होती?
अमेरिकेतील वाढती महागाई आणि जागतिक बाजारपेठेतील संमिश्र कल यादरम्यान गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात हिरवाई पाहायला मिळाली. व्यापार सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हांसह उघडले. 30 अंकांचा सेन्सेक्स सुरुवातीला 174.47 अंकांनी वाढून 53,688.62 च्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, 50 अंकांचा निफ्टी निर्देशांक सुमारे 54 अंकांनी वाढून 16,018.85 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांकात तेजी दिसून आली.
जागतिक बाजारपेठेत मंदी
दुसरीकडे, जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. अमेरिकेतील जून महिन्यातील चलनवाढीच्या आकडेवारीनंतर अमेरिकी बाजारांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. डाऊ जोन्स 450 अंकांच्या रेंजमध्ये 200 अंकांनी घसरून बंद झाला. नॅस्डॅकमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. युरोपीय बाजारात 1 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. आशियाई बाजारातही विक्रीचे वर्चस्व राहिले.
एलआयसी शेअर स्थिती
आज 14 जुलै रोजी एलआयसीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज LIC चा शेअर 3.85 म्हणजेच 0.54% ने घसरला आहे आणि तो 715.00 रुपयांवर पोहोचला आहे.