⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राज्यात सत्ता आणण्यासाठी शरद पवारांचा भाजपला पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । सध्या देशात आणि राज्यात सुरु असलेल्या राजकारणात कधी काय होईल? हे कोणीच सांगू शकत नाही. कारण एकमेकांचे कट्टर वैचारिक विरोधक असलेले पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी आणि भाजप यांनी नागालँडमध्ये एकत्र सत्तेत सहभागी होण्याचा आश्चर्यजनक निर्णय घेतला आहे.

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये सात आमदार आहेत. या सर्व आमदारांचा एनडीपीपीप्रणित रियो यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आग्रह होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं या आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.

यंदाच्या नागालँड विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी झेप घेतली. राष्ट्रवादीने इथं पहिल्यांदाच सात जागा जिंकल्या. पण 10 जागांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचा दावा करण्या इतपत राष्ट्रवादीची स्थिती नाही. हे लक्षात घेता त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.