शरद पवारांनी आता थांबावं ;मार्गदर्शन करावे – मंत्री अनिल भाईदास पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी त्यावेळी मी काही काळ थांबून मार्गदर्शन करू इच्छितो असं म्हटलं होतं. यामुळे शरद पवार यांनी आता खरंच थांबण्याची वेळ आली आहे. आणि आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांचा तो निर्णय योग्य होता असे मंत्री अनिल भाईदास पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
‘मी ना टायर्ड आहे ना मी रिटायर’ आहे. असं वाक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केल. यावेळी माझ्या वयावर जेव्हा कोणीही बोलतो तेव्हा मला अटलजींच ‘मै ना टायर्ड हू ना मै रिटायर्ड हु’ वाक्य आठवतं असं शरद पवार म्हणाले.
याला उत्तर देताना मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितलं की, शरद पवारांनी आता रिटायर व्हायला पाहिजे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि पक्ष कसा चालेल याकडे लक्ष दिले पाहिजे.