⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शरद पवारांनी शिवसेना फोडली, माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ । राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डाव साधून शिवसेना फोडली असल्याचा धक्कादायक दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. यावेळी कदम असेही म्हणाले कि, आधी राष्ट्रवादीशी संबंध तोडून टाका, त्यांच्या प्रवक्त्यांची हकालपट्टी करा, आणी मगच आमच्यावर कारवाई करा असा घणाघात माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनेचे नुकतेच हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांना खडेबोल सुनावले. यावेळी ते म्हणाले कि, गेल्या ५२ वर्षांपासून मी पक्षाचे काम केले आहे. अनेक दंगलींमध्ये मी मरता-मरता वाचलो. बाळासाहेब असतांना त्यांना याची कदर होती. ते आमचे मत विचारात घेत होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी तर बैठका सुध्दा बंद केल्या

ते असेही म्हणले कि. बाळासाहेबांची शिवसेना ही आजची शिवसेना राहिलेली नाही. महाविकास आघाडीत आपण जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असतांनाही ती डावलण्यात आली. पक्षाच्या नेत्यांना उध्दव ठाकरे भेटेनासे झाले. यातूनच आजची अवस्था ओढवली आहे. मात्र, उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

शिवसेना संपताना आम्ही बघू शकत नाही. शिवसेना पवारांनी संपवण्याचा विडा उचलला आहे. रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. यावेळी कदम म्हणाले की,  माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. पण, अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोलं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं,